पन्हाळ्यामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:40+5:302021-01-18T04:21:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : पन्हाळा शहरात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या निदर्शनाखाली ...

पन्हाळ्यामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क : पन्हाळा शहरात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या निदर्शनाखाली आणि उपस्थित प्लास्टिक निर्मूलन पथकामार्फत शहरातील दुकाने, व्यापारी संस्था यांच्यावर छापा टाकून अंदाजे पाच किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच प्लास्टिक न वापरण्याबाबत शपथ देण्यात आली. या मोहिमेमध्ये मुख्याधिकारी स्वरूप खारगे, आरोग्य अभियंता स्नेहल पन्हाळकर, संगणक अभियंता मुकुल चव्हाण, नगररचना सहाय्यक अंशुमन गायकवाड, मुकादम जयवंत कांबळे आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मुख्याधिकारी यांनी सर्व दुकानदारांना प्लास्टिक वापर संबंधित सक्त सूचना दिल्या. प्लास्टिक वापरल्यास किंवा वापरताना दिसल्यास प्रथम ५०००/- दंड, दुसऱ्या वेळेस १०,०००/- दंड तसेच तिसऱ्या वेळेस १५,०००/ दंड याप्रमाणे कारवाई होईल असे सूचित केले. पन्हाळा शहरात प्लास्टिक मुक्त करण्यात सहकार्य करावे असे आवाहन केले.