शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात येणाऱ्या प्रमुख मार्गावर कॅमेऱ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : कोणताही गुन्हा घडल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी आणि आरोपींना गजाआड करण्यासाठी सीसीटीव्हीची मोठी मदत होत असते. ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : कोणताही गुन्हा घडल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी आणि आरोपींना गजाआड करण्यासाठी सीसीटीव्हीची मोठी मदत होत असते. शहराचा विस्तार पाहता गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याबरोबर गुन्हेगारीला आळा बसावा या पार्श्वभूमीवर शहराला जोडल्या जाणाऱ्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रकल्प जयसिंगपूर पोलिसांनी हाती घेतला आहे. यामध्ये लोकसहभाग देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

सेफ सिटीअंतर्गत जयसिंगपूर शहरात २१ लाख रुपये खर्चाचा सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. शहरातील व्यापारी, उद्योजक यासह विविध सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेक दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले होते. जयसिंगपूर नगरपालिकेने देखील पुढाकार घेतला होता. त्यामुळे शहराअंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शंभर टक्के शहर सीसीटीव्ही झाले नसले तरी उपलब्ध असणाऱ्या कॅमेऱ्यामुळे पोलिसांना मदत झाली होती. शहरातील चोरीच्या घटनांचा मार्ग काढण्यासाठी सीसीव्हीची मोठी मदत देखील पोलिसांना झाली होती. मात्र, यातील बहुतांशी कॅमेरे बंद पडल्यामुळे तपासकामात अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान, शहरातील मुख्य चौक असणाऱ्या क्रांती चौकातील बंद कॅमेरे सुरू करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वेस्थानक या ठिकाणचे कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत, तर उदगांव चेकनाक्यावर कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. याचा फायदा गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांना होणार आहे. याशिवाय, शिरोळकडून येणाऱ्या मार्गाबरोबरच चौंडेश्वरी सूतगिरणी याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

लोकसहभाग महत्त्वाचा

शहराचा विस्तार पाहता सध्या अस्तित्वात असलेल्या सीसीटीव्हींची संख्या अपुरी आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जयसिंगपूर पोलिसांनी पुढाकार घेतला असला तरी यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, तरच जयसिंगपूर येणाऱ्या काळात सीसीटीव्हीयुक्त बनणार आहे.

कोट -

पहिल्या टप्प्यात जयसिंगपूर शहरात येणाऱ्या प्रमुख महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी शहरवासीयांनी देखील दक्षता घेतली पाहिजे.

- राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक.