इचलकरंजी : माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतलं. पक्ष कार्यालयात घेऊन जात आपल्या गळ्यात स्कार्फ घातला आणि भाजपला पाठिंबा दिल्याचे व उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, मी माघारी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, अशी माहिती भाजपच्या बंडखोर उमेदवार अश्विनी कुबडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाचा : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांत चुरस, 'या'ठिकाणी महायुतीतच कुस्तीकुबडगे म्हणाल्या, मी विद्यार्थी परिषदेपासून पक्षामध्ये काम करते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे वरिष्ठांनी सांगितले होते. त्यानुसार मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, यात गैर काहीच नाही. आवाडे यांनी मला त्यांच्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले. भाजप कार्यालयात जाऊन चर्चा करूया, असे सांगितले आणि तिथे आल्यानंतर चर्चा न करता पाठिंबा दिल्याचे सांगितले.
वाचा: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये आयात उमेदवार किती..जाणून घ्यापक्षाने मला कोणताही शब्द दिलेला नाही. माझी उमेदवारी जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुरेश हाळवणकर यांना चर्चेसंदर्भात काही माहिती नाही. गैरसमजुतीमधून त्यांनी मी माघार घेतल्याची घोषणा केली आहे.
Web Summary : Ashwini Kubadge, a BJP rebel in Ichalkaranji, alleges she was pressured by Prakash Awade to endorse the BJP and withdraw her candidacy. Kubadge insists she will contest, denying any withdrawal. She claims her candidacy is supported by the public, not the party.
Web Summary : इचलकरंजी में बीजेपी बागी अश्विनी कुबडगे का आरोप है कि प्रकाश अवाडे ने उन पर बीजेपी का समर्थन करने और अपनी उम्मीदवारी वापस लेने का दबाव डाला। कुबडगे ने जोर देकर कहा कि वह चुनाव लड़ेंगी, किसी भी तरह की वापसी से इनकार किया। उनका दावा है कि उनकी उम्मीदवारी को पार्टी नहीं, जनता का समर्थन है।