बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:28 IST2024-12-26T12:25:19+5:302024-12-26T12:28:26+5:30

ही घटना गुरुवारी पहाटे राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे दाऊतवाडी दरम्यान घडली. 

Bus overturns in accident, two dead; ten injured | बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी

बस पलटी होऊन अपघात, दोन मृ्त्यू; दहा जण जखमी

गौरव सांगावकर

राधानगरी: बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने खासगी बस पलटी होऊन दोघांचा मृत्यू तर दहा प्रवासी जखमी . ही घटना गुरुवारी पहाटे राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे दाऊतवाडी दरम्यान घडली. 

मृतांमध्ये मेहबूब (अद्याप पूर्ण नाव समजले नाही) तर आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. पोलिसांनी बस चालक  संदिप रामराव फड रा.लातूर याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोवा ते पुणे जाणारी श्रेयस ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच ११ सी एच ७४२२ ही खासगी ट्रॅव्हल्स कुडाळ हून पुण्याला जात असताना राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे दाऊदवाडी दरम्यान आल्यावर बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स डाव्या बाजूला पलटी झाल्याने हा अपघात झाला.

जखमीमध्ये अधिक प्रवासी पुण्याचे आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी राधानगरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून पुढील उपचार सीपीआर कोल्हापूर येथे चालू आहेत.

Web Title: Bus overturns in accident, two dead; ten injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात