बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:29 IST2020-06-02T19:28:10+5:302020-06-02T19:29:37+5:30
रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार"
बेळगाव : रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दुर्घटनाग्रस्त सेंट्रो कार बेळगाव कडून गणेशपुरच्या दिशेने निघाली होती. कॅम्प परिसरातील मिलिटरी हॉस्पिटल रस्त्यावर शौर्य चौकाजवळ सदर कारच्या बोनेटमधून धूर येण्यास सुरुवात होऊन अचानक भडका उडाला.
प्रसंगावधान राखून कारमधील चालकासह इतरांनी कार जागेवरच थांबवून सुरक्षित स्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
सदर दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारचा दर्शनीय भाग तर जळून बेचिराख झाला. रस्त्यावरील "बर्निंग कार"चा हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.