नाना पाटीलनगरात दोन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:11 IST2020-05-27T16:09:52+5:302020-05-27T16:11:24+5:30
रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटीलनगरशेजारी भानुदासनगरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून सुमारे २० हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना मंगळवारी (दि. २६) घडली. याबाबत नीरज अण्णासाहेब ढेरे (रा. विघ्नहर्ता संकुल, भानुदासनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

नाना पाटीलनगरात दोन ठिकाणी घरफोडी
कोल्हापूर : रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटीलनगरशेजारी भानुदासनगरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून सुमारे २० हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना मंगळवारी (दि. २६) घडली. याबाबत नीरज अण्णासाहेब ढेरे (रा. विघ्नहर्ता संकुल, भानुदासनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अज्ञात चोरट्यांनी नीरज ढेरे यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील स्वयंपाकघरातील गॅस टाकी व ड्रॉवरमधील रोख २० हजार रुपये चोरून नेले.
चोरट्यांनी शेजारी राहणारे दीपक शेळके यांच्या घराच्या मागील बाजूने उघड्या दरवाजातून प्रवेश करून आतील गॅस सिलिंडर चोरून नेले. याबाबत नीरज ढेरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात रोख रकमेसह दोन सिलिंडर चोरीची तक्रार दिली आहे.