कोल्हापूरात जरगनगरमध्ये घरफोडी; चोरट्यांचा चक्क अमेरिकन डॉलरवर डल्ला
By संदीप आडनाईक | Updated: June 11, 2023 23:14 IST2023-06-11T23:14:28+5:302023-06-11T23:14:53+5:30
जरग नगरच्या लेआउट क्रमांक एक व तीन येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार घरांमध्ये चोरी केली.

कोल्हापूरात जरगनगरमध्ये घरफोडी; चोरट्यांचा चक्क अमेरिकन डॉलरवर डल्ला
संदीप आडनाईक
कोल्हापूर - उपनगरातील जरग नगर परिसरातील चार घरांमध्ये घरफोडीचे प्रयत्न झाले. विशेष म्हणजे एका बंगल्यात चोरट्याने ४५० डॉलरवर डल्ला मारला. दुसऱ्या बंगल्यातील सोन्याचे दागिने मिळून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या गुन्ह्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
जरग नगरच्या लेआउट क्रमांक एक व तीन येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार घरांमध्ये चोरी केली. सकाळी घराचे कडीकोयडे उचकटलेले नागरिकाच्या लक्षात आले. विठ्ठल कुलकर्णी यांनी अमेरिकेतील नातेवाईकांकडून आणलेले ४५० डॉलरचे भारतीय मूल्य ३६ हजार रुपये इतके आहे. यासोबत हेमंत जोशी आणि अमर चौगुले यांच्या घरातही चोरी झाली. चौगुले यांच्या घरातून सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स चोरट्यांनी पळवले. याची किंमत सुमारे २५ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. एकाच रात्रीत चार घरात चोऱ्या झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.