शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घरचे बाहेर गेले, चोरट्यांनी घर 'साफ' केले; कोल्हापुरातील आर.के नगरात बंगले फोडून लाखोंचा ऐवज लंपास

By उद्धव गोडसे | Updated: August 17, 2023 18:16 IST

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला

कोल्हापूर : आरके नगर येथील अष्टविनायक पार्क आणि सहा नंबर सोसायटीमध्ये दोन अभियंत्यांच्या बंद बंगल्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरीच्या दोन्ही घटना शुक्रवारी (दि. ११) ते बुधवारच्या (दि. १६) दरम्यान घडल्या. करवीर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, घरमालक जयदीप गंगाधर थोरात (वय ३४, रा. आरके नगर) हे शुक्रवारी पत्नीसह बाहेरगावी गेले होते. बुधवारी सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या स्थितीत दिसला. चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. चोरट्यांनी साडेनऊ हजार रुपयांची रोकड, दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची चेन, नऊ ग्रॅमच्या लहान अंगठ्या, चांदीचे पैंजण, जोडवी असा सुमारे एक लाख एक हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा उल्लेख थोरात यांनी फिर्यादीत केला आहे.सहा नंबर सोसायटीमधील संजय श्रीपाद परुळेकर (वय ७१) यांच्या बंगल्यात मंगळवारी (दि. १५) पहाटे चोरट्यांनी चोरी केली. वरच्या मजल्यावर राहणा-या भाडेकरूंच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरट्यांनी परुळेकर यांच्या घरात डल्ला मारला. दरवाजा उघडत नसल्याने भाडेकरूंनी परुळेकर यांना फोन केला. त्यानंतर परुळेकर यांचे भाऊ दरवाजा उघडण्यासाठी पोहोचताच चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील दागिने लंपास केले.चोरीच्या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकासही पाचारण केले होते. उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी पाहणी करून तपासाबद्दल सूचना दिल्या. गुरुवारी रात्रीपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने चोरट्याने नेमका किती लाखांचा ऐवज लंपास केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस उपनिरीक्षक निवास पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस