शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Budget 2018 : घोषणा चांगल्या परंतू प्रत्यक्ष लाभ होणार का..? - डॉ यशवंत थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:45 IST

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य दिले याचे मी स्वागतच करतो. परंतु अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आाणि त्याचा शेतक-यांना होणारा प्रत्यक्ष लाभ यात मोठे अंतर असते. - नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात

कोल्हापूर  -  केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य दिले याचे मी स्वागतच करतो. परंतु अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आाणि त्याचा शेतक-यांना होणारा प्रत्यक्ष लाभ यात मोठे अंतर असते. शेतक-याचे रोजचे उत्पन्न किती वाढले या निकषावरच त्याच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचे मुल्यमापन व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी व्यक्त केली. डॉ. थोरात म्हणाले,‘नुसत्या घोषणा व तरतूदी केल्या म्हणून त्याचे जगणे सुसह्य होईल असे म्हणता येत नाही.

सरकारने त्याला ताजमहाल बांधून देतो असे सांगितले तरी आहे परंतू तो आजपर्यंत बांधून दिलेला नाही आणि तो पुढे कधी बांधून मिळेल याबध्दलही खात्री नाही. तो जेव्हा बांधून होईल तेव्हाच सरकारचे आश्वासन खरे झाले असे म्हणता येईल. अर्थसंकल्पातील तरतूदींचेही ब-याचदा असेच असते. म्हणून ज्या तरतूदी केल्या आहेत, योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा शेतक-यांना प्रत्यक्ष लाभ व्हावा यासाठी सरकारने सक्षम यंत्रणा उभी केली पाहिजे.’, असेही थोरात म्हणालेत.

Budget 2018 : 2020 पर्यंत शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करणार - अरूण जेटली 

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पात सरकारने कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसतं, कारण यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या आहेत.  यावर्षीचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित असेल असं जेटलींनी सुरूवातीलाच सांगितलं.  

2020 पर्यंत शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे असं जेटली यांनी बजेट सादर करताना सांगितलं. 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा जेटलींनी केली.  470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या असून उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली.  मत्स्यपालन, शेतीतील पायाभूत सुविधा आणि पशुपालनासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचं अरुण जेटली यांनी सांगितलं.  शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी शेतमालाच्या एकूण उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम हमीभाव म्हणून मिळणार असल्याची घोषणा जेटली यांनी केली. केवळ चांगला हमीभाव देऊनच भागणार नाही. त्यासाठी उत्तम सरकारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचेही जेटलींनी म्हटले.

उत्पादन मुल्याच्या दीडपट भाव शेतक-यांच्या मालाला मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं जेटली म्हणाले. आज देशातलं कृषी उत्पादन उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक आहे, 3 लाख कोटी फळांचं उत्पन्न घेतलं. यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

ठळक मुद्दे -

- शेती कर्जासाठी तब्बल 11 लाख कोटींची तरतूद - अन्न प्रक्रिया उद्योग वर्षाला 8 टक्क्याच्या वेगाने वाढत आहे, त्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद.- कृषी क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी 22 हजार कोटींची तरतूद.- 100 बिलियन डॉलरचा शेतमाल सध्या निर्यात केला जातो. त्यासाठी 42 फूडपार्क उभारणार.- 40 मेगा फूड पार्क उभारण्याची योजना.- 470 एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत, 585 शेती मार्केटच्या सुधारणांसाठी 2 हजार कोटींची तरतूद.- नाबार्डच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन सुरू आहे. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.- मत्स्य शेती आणि पशूसंवर्धन विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद.- विशेष कृषी उत्पादन मॉडेल विकसित करण्याची गरज - अरुण जेटली- यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधांन्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे - अरूण जेटली- शेतकऱ्यांप्रती कटीबद्ध असलेलं सरकार. 2020पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं ध्येय- अरूण जेटली.- कमी किंमतीत जास्त उत्पन्न घेता यावं यासाठी शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न - अरुण जेटली- शेतकरी कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध, शेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटली