शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

बुद्धिवैभव हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:21 IST

इंद्रजित देशमुख मागील एका लेखामध्ये आपण शुद्ध आणि सात्विक बुद्धिबद्दल चिंतन करीत होतो. आपल्या त्यावेळच्या चिंतनात आपण असं चिंतीलं ...

इंद्रजित देशमुखमागील एका लेखामध्ये आपण शुद्ध आणि सात्विक बुद्धिबद्दल चिंतन करीत होतो. आपल्या त्यावेळच्या चिंतनात आपण असं चिंतीलं होतं की, बुद्धी हे आपल्याला लाभलेलं एक वरदानच समजावे लागेल; पण या वरदानाचा वापर योग्यवेळी योग्य पद्धतीने केला तरच ही बुद्धी वरदान ठरते, अन्यथा तिचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला की ती शापही ठरू शकते. लहान असताना आपण एक कथा ऐकली होती. एक पाण्याने काठोकाठ भरलेल्या नदीत मुंगी पडलेली असते. मुंगी प्रवाहाबरोबर वाहत चाललेली असते. तिला तिच्या ताकदीने या प्रवाहातून बाहेर पडणे शक्य होत नसते. पाण्याच्या प्रवाहाची गती इतकी तीव्र असते की तिच्या प्रयत्नांचा विचार करता तिच्यासमोर या अरिष्टातून वाचावा, असा दुसरा कोणताच पर्याय नसतो. साहजिकच त्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाण्याशिवाय कोणताच पर्याय तिच्याकडे नसतो; पण त्या अवस्थेतसुद्धा ती मुंगी आशेचे किरण शोधत असते आणि म्हणूनच ती आपले प्रयत्न थांबवत नाही. ती त्याच पाण्यातून वाहत आलेल्या एका झाडाच्या पानावर बसते. पानाच्या आधारामुळे तिचे श्रम कमी होतात आणि ती कधी तरी कुठे तरी त्या पानाच्या आधाराने काठाशी म्हणजेच किनाऱ्यावर येते आणि तिचा जीव वाचतो.ऐकायला आणि जाणवायला छोट्या असणाऱ्या गोष्टीतून आम्हाला खूप मोठा अर्थ सापडतो. त्या मुंगीने त्या कठीण परिस्थितीत स्वत:च्या बुद्धीने धैर्य आणि प्रयत्न यांना चालना दिली नसती तर ती कधीच वाचू शकली नसती. विकास आणि विनाश या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणाºया चालना आणि गती या बुद्धीच्या माध्यमातून आमच्याकडे तयार होत असतात म्हणूनच या बुद्धीच्या बळावरच अशक्य वाटू शकणाºया किंवा अशक्य वाटणाºया कितीतरी गोष्टी शक्यतेत उतरण्याचा प्रयत्न माणूस करीत आहे. या बुद्धीचा आधार घेऊनच माणूस आपल्या पारमार्थिक आणि आध्यात्मिक जीवनात सुखाच्या किंवा सहजतेच्या मार्गाने प्रयत्न करतो आहे आणि साहजिकच सुखरूप किंवा सहजरूप बनू पाहतो आहे. याचं कारण बुद्धीच आहे. या सगळ्याच तºहेच्या जीवनसंपन्नतेसाठी बुद्धी कारणीभूत आहे म्हणून बुद्धीला दैवी गुणांमध्ये गणलेलं आहे. अगदी अष्मयुगीन कालखंडामध्ये डोंगरावरून घरंगळत येणारा लाकडाचा ओंडका मानवाने पाहिला आणि त्यातून त्याने चाकाचा शोध लावला. आज त्या चाकाचा वापर करून माणसाने कुठच्याकुठे आपली प्रगती केली आहे. सुरुवातीला बेचव आयुष्य जगत असलेल्या मानवी जीवनामध्ये बेचव अन्न खात असताना कधी तरी मिठाचा शोध लागला आणि या मिठाच्या प्रमाणाभूत वापराने माणसानं आपलं जेवण रूचकर बनवलं. कितीतरी किलोमीटरचा प्रवास पायाने चालत असताना वेळ आणि श्रम यांच्या बाबतीत होणारे हाल कमी करण्यासाठी याच बुद्धीचा वापर करून माणूस गती, अतिगती, महागती आणि आता तर परमगतीने म्हणजेच भूपृष्ठ, जलमार्ग आणि हवाईमार्ग अशा कितीतरी मार्गाने दौडू लागला आहे. हा त्याने आपल्या बुद्धीचा केलेला व्यवस्थित वापरच आहे आणि या वापरामुळे त्याचं आयुष्य सुखी झालं आहे. म्हणूनच ही बुद्धी त्याला वरदानच ठरली आहे.संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेल्या,साधोनी बचनाग खाती तोळा तोळा।आणिकाते डोळा न देखवे।।साधोनी भुजंग धरतीला हाती।अनिके कापती देखोनिया।।असाध्य ते साध्य करिता सायास।कारण अभ्यास तुका म्हणे।।या वचनाप्रमाणे पचण्यासाठी कठीण असणारे किंवा न पचणारे आणि त्यातूनही जबरदस्तीने स्वीकारलच तर मरायला लावणारे विष माणसाने बुद्धीचा वापर करून काही मात्रांच्या प्रमाणात प्राशन करून ते पचविलं, किंवा पचविण्याचा प्रयत्न केला. अतिशय विषारी असणारे असे विषारी सर्प माणूस हाताळू लागला, या सगळ्या अजब वाटणाºया गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहणारसुद्धा नाही किंवा जबरदस्तीने पाहू लागलो तर आमचे हात-पाय कापतील; पण तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धीच्या विनियोजनात्मकभावाने अभ्यास करून माणसाने अशा अशक्य गोष्टी शक्यतेत परावर्तित केलेल्या आहेत. अकबराच्या आणि बिरबलाच्या गोष्टीमध्ये कुणातरी शत्रू राष्ट्राने मोकळ्या माठांमध्ये भरून मागितलेल्या शहाणपणासाठी बिरबल ज्यावेळी त्याच मोकळ्या माठांमध्ये भोपळे भरून पाठवितो त्यावेळी हीच बुद्धी कठीणसमयी आपली ढालही बनू शकते. याचा अर्थबोध आम्हाला होतो. आपल्या छत्रपती शिवप्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये काही वर्षांनंतर होणाºया आपल्या राज्याभिषेकासाठी ऐनवेळेला रायगडासारख्या दुर्गम गडावर मोठ्या हत्तींना नेता येणार नाही म्हणून राज्याभिषेकापूर्वीच कितीतरी वर्षे छोट्या हत्तीच्या पिलांना रायगडावर नेलं होतं आणि याच हत्तींचे मोठे झालेले रूप आपल्याला शिवराज्याभिषेकावेळी पाहायला मिळालेलं होतं. हे आणि असंच कितीतरी प्रकारचं देखणं आणि नेटकं बुद्धी विनियोजन आपल्या शिवइतिहासामध्ये पाहायला मिळतं. ज्याला सर्वांगीण सामर्थ्य आपल्या ठायी धारण करायचं आहे त्याच्या ठायी हे विनियोजनात्मक बुद्धिवैभव असलंच पाहिजे. सामान्याला विशेषत्वात परावर्तित करण्याचं सामर्थ्य या बुद्धीच्या सात्विक वापरात आहे. आमच्याकडून ते व्हावं आणि आम्ही सखोल संपन्न व्हावं ही अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)