शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलाव सुशोभीकरणात 'युनिटी'चा उजेड

By admin | Updated: January 24, 2015 00:07 IST

दहा कोटींचा निधी पडून : दीड वर्षांत फक्त निविदा प्रक्रियाच; महापालिकेचेही दुर्लक्ष

संतोष पाटील- कोल्हापूर -कळंबा तलाव व परिसर संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी येऊन तब्बल दीड वर्ष उलटले. काळम्मावाडी थेट पाईपलाईनची सल्लागार कंपनी ‘युनिटी कन्सल्टंट’ने डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केला. मात्र, निविदा प्रक्रियेतच सुशोभीकरण अडकले आहे. पाईपलाईनचे काम कासवगतीने होण्यामागे ‘युनिटी’ अकार्यक्षम असल्याचा आरोप महासभेत नगरसेवकांनी केला. कळंबा तलाव सुशोभीकरणाचे कामही त्यांच्यामुळेच रखडल्याने नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कळंबा तलाव परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी दहा कोटींच्या निधीची घोषणा केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्याचे थाटात उद्घाटनही झाले. प्रत्यक्ष काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, महापालिका प्रशासनाने साडेसात कोटी रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविली. कामास लवकरच सुरुवात होणार असल्याने पुढील सहा महिन्यांत कळंबा परिसर उजळणार असल्याचे चित्र उभे केले. मात्र, प्रशासकीय स्तरावर वर्षभर हालचालच झाली नाही. तलावाच्या सुशोभीकरणाचा आराखडा ‘युनिटी’च्या सल्ल्याने पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. नागरिकांना तेथे स्वच्छ हवा मिळावी, मनाला शांतता लाभावी, सुंदर अशा बगीच्यामुळे विरंगुळा मिळावा, असा हेतू या सुशोभीकरणामागे आहे. तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी तारेचे कुंपण, तलावातील पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. मात्र, हा आराखडा अद्याप कागदावरच आहे. तब्बल तीन वेळा निविदा काढून ठेकेदारांचा प्रतिसाद नाही, याचे उत्तर शोधून निविदेत योग्य तो बदल करण्याची जबाबदारी सल्लागार कंपनीची; मात्र, ‘युनिटी’ला काहींचे पाठबळ आहे. ‘युनिटी’च्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. कळंबा तलाव सुशोभीकरण रखडल्याने नागरिक, पर्यावरण व पक्षीप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. थेट पाईपलाईननंतर आता पुन्हा ‘युनिटी’च्या कारभारावर वादंग उठण्याची शक्यता आहे.