ब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:33+5:302021-02-05T07:06:33+5:30
प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, केवळ शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच लोकप्रतिनिधी या नात्याने १० वर्षे मुदतीने गडहिंग्लज कारखाना सहयोग तत्त्वावर ...

ब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार : हसन मुश्रीफ
प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, केवळ शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच लोकप्रतिनिधी या नात्याने १० वर्षे मुदतीने गडहिंग्लज कारखाना सहयोग तत्त्वावर चालवायला घेण्यास आपण कंपनीला तयार केले. ३० सप्टेंबर,२०१३ अखेर कारखान्याने ताळेबंदात दाखवलेल्या ८३ कोटी देयकांपैकी ४३ कोटी देयके शासनाने मान्य केली. बाकीची रक्कम सत्य-असत्यता (डू-डिलिजन्स) पडताळणीसाठी समिती नियुक्त केली आहे. कंपनी येण्यापूर्वी कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या क्लोजर नोटिसीची माहिती कंपनीच्या निदर्शनास आणली नव्हती. त्यामुळे नाइलाजास्तव ८ कोटी ८२ लाख ३५ हजार रुपये अदा करावे लागले. हंगामी व रोजंदारीवरील नोकरांना कायम करावे आणि फिटमेंटच्या मागणीसाठी गेटवर आंदोलन करून कंपनीची बदनामी करण्यात आली. तरीदेखील करारात नसलेली युनियन बँकेची ३ कोटी व स्टेट बँकेची साडेपाच कोटींची देणी अदा करून कंपनीने संचालक मंडळाच्या गळ्याचा फास सोडवला. करारानुसार सभासदांना दरवर्षी १० किलो साखर द्यायची होती. परंतु, कंपनीने दरवर्षी १०० व ५० किलो साखर देऊन ८ कोटी ४१ लाख ८६ हजाराचा भुर्दंड सोसला. गळीत वाढविण्यासाठी ८ कोटी ९७ लाख खर्चून मशिनरीचे आधुनिकीकरण केले. एकंदरीत या सर्व बाबींवर कंपनीने आतापर्यंत करारामध्ये अंतर्भूत नसतानाही ३४ कोटी ७१ लाख २१ हजार इतका खर्च केला.
ऊस उत्पादकांची एफ. आर. पी., तोडणी - वाहतूक बिले, कामगारांचा पगार कंपनीने वेळेवर दिला. तरीदेखील कंपनीस कारखाना चालविणे अशक्य करून टाकले आहे. त्यामुळे यापूर्वीच आपण संचालक मंडळास धोक्याचा इशारा दिला आहे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
--------
चौकट
जबाबदारी कारखान्याचीच...!
८३ कोटींच्या देण्यांमध्ये कारखान्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोणतीही देणी ताळेबंदात दाखवलेली नाहीत. त्यामुळे लवाद म्हणू
साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्तांची थकीत रक्कम देण्याची जबाबदारी कारखान्याचीच आहे, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात नमूद केले आहे.
-------
कारखान्याच्या भवितव्याची काळजी
५००० मे. टन गाळप क्षमता, सहवीज व इथेनॉलची निर्मिती करणारा कारखानाच साखर व्यवसाय टिकू शकतो. गडहिंग्लज कारखान्याची मशिनरी अत्यंत जुनी असून, कारखाना सातत्याने बंद पडतो. मुळातच प्रतिटन ५०० ते ६०० रुपयांनी कंपनी तोट्यात आहे. त्यामुळे कंपनी कारखाना सोडून गेली तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे तालुक्यातील एकमेव असणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाच्या भवितव्याची आपणांस काळजी वाटते, असेही मुश्रीफांनी नमूद केले आहे.
---
बातमीत मुश्रीफ यांचा फोटो वापरावा.