शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिरोळमध्ये वीटभट्टी मुजराचा शस्त्राने वार करुन खून, मृत मिरज तालुक्यातील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:17 IST

शिरोळ : शिरोळ -कनवाड या रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या बांधकामावर वीटभट्टी मुजराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ...

शिरोळ : शिरोळ-कनवाड या रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या बांधकामावर वीटभट्टी मुजराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. राजू दिलीप कोलप ( वय ४० रा. निलजी बामणी, ता.मिरज, जि. सांगली) असे मृताचे नाव असून, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरोळ-कनवाड रस्त्यावरील आण्णासो महात्मे यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासमोर त्यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी सायंकाळी महात्मे कुटुंबातील व्यक्ती जनावरांचे चारापाणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती झोपल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मृत व्यक्ती ही येथील माने यांच्या वीटभट्टीवर काम करणारा मजूर असल्याचे स्पष्ट झाले.रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी राजू घोलप याचा धारदार शस्त्राने खून केला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजू यांच्या डोक्यावर, छातीवर, डाव्या हातावर धारदार शस्त्राने वर्मी घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा सुरू होता. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. खुनाची बातमी समजतात घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस