The breath of the city is their breath: Commissioner Kalshetti | शहराचा ध्यास हाच त्यांचा श्वास : आयुक्त कलशेट्टी
शहराचा ध्यास हाच त्यांचा श्वास : आयुक्त कलशेट्टी

ठळक मुद्देउद्याचे नियोजन करून पहाटे चार वाजल्यापासून सहकारी अधिकाऱ्यांना झोपेतून उठवत असे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या बचावकार्यात खूप मोठी भूमिका बजावली. पावसाळ्यापूर्वीच त्यांनी नियोजन केले, त्याप्रमाणे त्यांनी काम केले; परंतु नियतीने मोठे आव्हान दिले तेव्हा न डगमगता हा अधिकारी धैर्याने संकटाला सामोरा गेला. उपलब्ध मनुष्यबळ व साधनांच्या सहाय्याने चार दिवसांत त्यांनी दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. सकाळी सहा वाजता बाहेर पडणारा हा अधिकारी रात्री उशिरा घरी परतायचा. त्यानंतर उद्याचे नियोजन करून पहाटे चार वाजल्यापासून सहकारी अधिकाऱ्यांना झोपेतून उठवत असे.

देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक आधार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. आपली सर्व शक्ती पणाला लावून शासनाकडून अधिकारी आणण्यातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराच्या काळात खºया अर्थाने ते देवदूत बनले.


Web Title: The breath of the city is their breath: Commissioner Kalshetti
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.