शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

तीन उद्योगांचे वीज-पाणी ४८ तासांत तोडा

By admin | Updated: June 11, 2015 01:06 IST

‘प्रदूषण’ची कारवाई : वीजवितरण कंपनीला आदेश; धावपळ, दबावाचा प्रयोग

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील कागलजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडोकाऊंट टेक्स्टाईल कंपनी व टेक्स्टाईल पार्कमधील सुदर्शन जीन्स, प्रतिभा दूध प्रकल्प यांचा प्रदूषणप्रश्नी ४८ तासांत वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिला. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नरसिंग शिवांगी यांनी हा आदेश वीजवितरण कंपनीचे अधिकारी आणि औद्योगिक विकास महामंडळाला दिला आहे. नोटिसीमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ माजली आहे. प्रत्यक्षातील कारवाई टाळण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची पळापळ सुरू होती.कागल आणि हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील काही प्रकल्पांतून औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेविना उघड्यावर सोडल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदी प्रदूषणास औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित पाणीच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियमाप्रमाणे औद्योगिक वसाहतीमधील एकत्रित औद्योगिक सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असणे आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी शोषून घेण्यासाठी वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात औद्योगिक आणि कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या पाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया होत नाही. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्नही उपस्थित झाला. संपूर्ण औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे जलस्रोत दूषित केल्याप्रकरणी इंडोकाऊंट, सुदर्शन, प्रतिभा दूध प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सर्व औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. प्रदूषित पाणी उघड्यावर सोेडून जलस्रोत दूषित केल्याप्रकरणी इंडोकांऊट, सुदर्शन, प्रतिभा दूध या प्रकल्पांचा वीज व पाणीपुरवठा ४८ तासांत बंद करण्याचा आदेश दिला आहे. - मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाप्रमाणे ४८ तासांची मुदत संपल्यानंतर वीजपुरवठा खंडितची कारवाई केली जाईल. - दीपक कुमठेकर, अभियंता, वीज वितरण कंपनी