कनाननगरमध्ये घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:53 IST2019-07-11T16:52:33+5:302019-07-11T16:53:27+5:30

तोंडाला रुमाल बांधून घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड करण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार येथील कनाननगरात घडला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ल्याचा प्रकार घडला असून, त्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

Break into the house of Kananagar and break the practical pieces | कनाननगरमध्ये घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोड

कनाननगरमध्ये घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोड

ठळक मुद्देकनाननगरमध्ये घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोडपूर्ववैमनस्यातून प्रकार : सहाजणांवर पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : तोंडाला रुमाल बांधून घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड करण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार येथील कनाननगरात घडला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ल्याचा प्रकार घडला असून, त्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कनाननगर येथील अण्णा भाऊ साठे चौकात संगीता उमेश लोखंडे (वय ४०) यांच्या घरात तोडफोड करण्याच्या उद्देशाने सहाजण घुसले, त्यांपैकी दोघा अनोळखी लोकांच्या तोंडावर रुमाल बांधले होते.

या सहाजणांनी लोखंडे यांच्या घरात जबरदस्तीने घुसून घरातील प्रापंचिक साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर त्यांनी संगीता लोखंडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

याबाबत लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंदा दीपक जाधव, सौरभ दीपक जाधव, हार्दिक दीपक जाधव, हसन शेख (सर्व रा. अण्णा भाऊ साठे चौक, कनाननगर, कोल्हापूर) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Break into the house of Kananagar and break the practical pieces