कर्जदारास मारहाण, सावकारास अटक
By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-14T00:53:33+5:302014-07-14T01:01:50+5:30
पोलिसांकडून अटक

कर्जदारास मारहाण, सावकारास अटक
कोल्हापूर : महिना सात टक्के व्याजाने घेतलेले कर्ज फेडूनही पुन्हा पैशासाठी तगादा लावून कर्जदारास मारहाण करणाऱ्या सावकाराला करवीर पोलिसांनी काल, शनिवारी रात्री अटक केली. संशयित सावकार अमित प्रकाश घोरपडे (वय ३४, रा. बळवंतनगर) असे त्याचे नाव आहे.
फिर्यादी प्रसाद दिनकर मोरे (२६, रा. बाबा जरगनगर) यांनी घोरपडे याच्याकडून महिना ७ टक्के व्याजाने ८५ हजार रुपये घेतले होते. ही रक्कम व्याजासह मुद्दल असे सुमारे ९० हजार रुपये देऊनही त्याने पुन्हा पैशासाठी तगादा लावला.
दरम्यान, प्रसादचे वडील काल घोरपडेच्या घरी गेले असता त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी घोरपडे याने त्यांना दमदाटी करीत मारहाण केली. या प्रकरणी प्रसादने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने अशा पध्दतीने बेकायदेशीर व्याजाने पैसे कोणा-कोणाला दिले आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे करीत आहेत. (प्रतिनिधी)