शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या दोन्ही सामन्यांत ‘बरोबरी’च

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

केएसए लीग फुटबॉल : खंडोबा विरुद्ध फुलेवाडी; दिलबहार ब विरुद्ध पॅट्रीयट सामने टाय

कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, सोमवारी तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यातील सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली; तर दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध पॅट्रीयट स्पोर्टस् या दोघांमधीलही सामना १-१ असा बरोबरीतच राहिला. दोन्ही सामने शेवटच्या काही क्षणात अटीतटीचे झाले. छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत दुपारच्या सत्रात पहिला सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रिडा मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘फुलेवाडी’कडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्यास तितक्याच जोरदारपणे प्रतिकार करीत प्रतिआक्रमण केले. ६ व्या मिनिटाला ‘फुलेवाडी’च्या तेजस जाधवने सूरज शिंगटेच्या पासवर गोलची नोंद करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘खंडोबा’कडून श्रीधर परब, चंद्रशेखर डोका, सचिन बारामती यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत फुलेवाडीच्या गोलक्षेत्रात पाच वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, फुलेवाडीचा गोलरक्षक निखील खाडेने उत्कृष्ट गोलरक्षण करीत ते अडवले. ४० व्या मिनिटास मिळालेल्या कॉर्नर किकवर खंडोबाच्या श्रीधर परबने अचूक गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात खंडोबाकडून विकी सुतार, सागर पोवार, शशांक, अर्जुन शेतगावकर यांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या. शेवटच्या काही मिनिटात दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. फुलेवाडीकडून अजित पोवार, अरुणोशु गुप्ता, तेजस जाधव, मंगेश दिवसे, रौफ खान, दिग्विजय वाडेकर यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.दुसरा सामना दिलबहार ‘ब’ विरुद्ध पॅट्रीयट स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी कंटाळवाण्या खेळाचे प्रदर्शन केले. दिलबहार ‘ब’ कडून आदित्य माने, शुभम सरनाईक, सुशिल माने, शुभम माळी, महमद मोईन यांनी ‘पॅट्रीयट’च्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. मात्र, पॅट्रीयटच्या सजग बचावफळीने त्या निष्प्रभ ठरवल्या. १९ व्या मिनिटास दिलबहार‘ब’ च्या महमद मोईनने गोलरक्षकाला चकवत गोलची नोंद केली. या गोलमुळे दिलबहार ‘ब’ने सामन्यात १-० अशी आघाडी मिळवली. पॅट्रीयटकडून राहुल देसाई, रजत शेट्टी, सय्यद नईमुद्दीन यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ६० व्या मिनिटास पॅट्रीयटच्या आदित्य साळोखेने मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर केले. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत एकमेकांच्या गोलक्षेत्रात धडक मारली. मात्र, दोन्ही संघांना अखेरपर्यंत आघाडी घेता न आल्याने सामना १-१ असा बरोबरीत राहीला. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ या दोन संघांच्या लढतीमधील एक चुरशीचा क्षण.