पोर्ले तर्फ बोरगाव ग्रामपंचायत ग्रामस्वराज्य मध्ये राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:39+5:302021-04-04T04:24:39+5:30

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव ग्रामपंचायतीने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १०० टक्के करवसुली व त्यातून खर्च करावा ...

Borgaon Gram Panchayat towards Porle is the first in the state in Gramswarajya | पोर्ले तर्फ बोरगाव ग्रामपंचायत ग्रामस्वराज्य मध्ये राज्यात प्रथम

पोर्ले तर्फ बोरगाव ग्रामपंचायत ग्रामस्वराज्य मध्ये राज्यात प्रथम

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव ग्रामपंचायतीने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १०० टक्के करवसुली व त्यातून खर्च करावा लागणारा निधी ३१ मार्चअखेर खर्च करून आणि ग्रामस्वराज्यमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. ग्रामपंचायतीने गावातील पाणीपट्टी, घरफळा, दिवाबत्ती व इतर बाबीमधून ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर वसुली करून त्यातून ५ टक्के दिव्यांग निधी १० टक्के महिला बालकल्याण निधी १५ टक्के मागास निधी शंभर टक्के खर्च करून राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवला आहे. पोर्ले तर्फ बोरगाव येथील श्रमिक वाचनालयाच्या वतीने ग्रामसेवक रामहरी वरकले, केंद्र संचालक संदीप काटकर कर्मचारीवर्ग अंकुश डोंब, गजानन काटकर मुख्याध्यापक आनंदा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सुनिता म्हेतर, उपसरपंच प्रकाश काटकर, संदीप काटकर,रावसाहेब काटकर, धनाजी काटकर, सुरेश काटकर यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

पन्हाळ्याचे गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे विस्ताराधिकारी पी.डी. भोसले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष कौतुक केले.

Web Title: Borgaon Gram Panchayat towards Porle is the first in the state in Gramswarajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.