शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळावर बॉम्बची धमकी, पोलिसांची सुरक्षेसाठी कवायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:19 IST

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना सोमवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळताच बॉम्ब डिटेक्शन आणि ...

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना सोमवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळताच बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वाडच्या जवानांनी केवळ पंधरा मिनिटांतच विमानतळाच्या ३९०० चौरस मीटरमधील इमारतीत तसेच कानाकोपऱ्यामध्ये शोध घेत पुढील पंधरा मिनिटांमध्ये संबंधित बॉम्ब निष्प्रभ केला. ही काही प्रत्यक्षात घडलेली घटना नव्हती, तो एक कवायतीचा भाग होता.बॉम्बची धमकी देऊन विघातक कारवाईची शक्यता विमान सेवेमध्ये येऊ शकते. अशा प्रसंगास तोंड देण्यासाठी सोमवारी ही नागरी विमान उड्डाण सुरक्षा ब्युरो यांच्या निर्देशानुसार वार्षिक कवायत पार पडली. यात कोल्हापूर पोलिसांचे विमानतळ सुरक्षा पथक आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाडसह अन्य पोलिस दल, कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच इंटेलिजन्स ब्युरो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विमान वाहतूक नियंत्रण, संचार विभाग, अग्निशमन दल आणि सुरक्षा अधिकारी यांनी भाग घेतला. बॉम्बची धमकी मिळताच इमारतीच्या आतमधील सर्व उपस्थितांना सुरक्षित असेंब्ली पॉईंट्सकडे जाण्याची सूचना देण्यात आली. सेक्युरिटी होल्डमधील लोकांना एअरसाईड अर्थात विमाने उभी राहतात त्या दूर अंतरावर एक असेंब्ली पॉईंट आणि इतरांसाठी विमानतळाबाहेरील दुसऱ्या असेंब्ली पॉईंटजवळ निर्देश फलक लावले आहेत. विमानतळ पोलिस सुरक्षा दलाच्या प्रमुख स्नेहा गिरी यांनी कंट्रोल रूमशी समन्वय ठेवला. धमकी देणाऱ्या मोबाईल नंबरचा पत्ता सायबर सेलने काही मिनिटांतच काढला. त्याचे लोकेशनही शोधून काढले आणि त्या व्यक्तीपर्यंत विनाविलंब पोहोचण्याचीही कार्यवाही कोल्हापूर पोलिसांनी केली. अशा प्रकारची खोटी धमकी दिल्यास एफआयआर दाखल करून त्या व्यक्तीविरुद्ध खटला भरण्याचे आदेश बीसीएएस मार्फत दिले गेले. कवायतीत करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, बीडीडीएसचे चौगुले, डॉग सिंबा आणि पथक, कमांडो फोर्सचे निकम आणि पथक, दहशतवाद विरोधी पथकाचे बाबर आदी अधिकारी सहभागी झाले. विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी जितेंद्र पचौरी यांनी कवायतीचे संचलन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळBombsस्फोटकेPoliceपोलिस