शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका प्रभाग रचना, आरक्षणाचा ‘बॉम्ब’ आज फुटणार

By admin | Updated: July 31, 2015 00:41 IST

रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये जाहीर सोडतीद्वारे प्रभाग आरक्षणे निश्चित केली जाणार

कोल्हापूर : आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यावरील आरक्षणाची सोडत आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये जाहीर सोडतीद्वारे प्रभाग आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत. दरम्यान, सकाळी नऊ वाजता ८१ प्रभागांची नावे व नकाशाच्या प्रती महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित होणार आहेत. प्रभाग रचना नेमकी कशी असणार, यासंबंधी इच्छुकांत मोठी उत्सुकता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना सादर करण्याकरिता ३ ते १० आॅगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हरकती व सूचनांचे विवरणपत्र १३ आॅगस्टला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. आज प्रभागांचे क्षेत्र, त्यांचे नकाशे यासंबंधीची माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. तसेच बहुउद्देशीय हॉलवरही ते पाहायला मिळणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने यावेळी ८१ प्रभाग तयार केले असून, त्यामधील ४१ प्रभाग महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. शहरात चार लाख ७० हजार इतके मतदार असून, ते ८१ प्रभागांत विभागले गेले आहेत. प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्याकरिता २१ जानेवारी २०१५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत ही यादी अद्ययावत केली जाणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. (प्रतिनिधी)