शरीरसौष्ठवपटू खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:07 IST2019-09-16T05:06:59+5:302019-09-16T05:07:06+5:30

शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती उघडून महिला, तरुणींशी लगट करीत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न भामट्याने केला आहे.

Bodybuilder Khamkar names fake accounts on Facebook | शरीरसौष्ठवपटू खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती

शरीरसौष्ठवपटू खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती

कोल्हापूर : शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती उघडून महिला, तरुणींशी लगट करीत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न भामट्याने केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खामकर यांनी मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
खामकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपण शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. महाराष्टÑ शासनाने माझी महसूल खात्यामध्ये अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अज्ञातांनी माझे नाव व फोटो वापरुन फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच टिकटॉक या सोशल नेटवर्किंग साईटवरती बनावट खाती उघडून मीच खरा सुहास खामकर आहे असे भासवून महिलांशी, तरुणींशी संभाषण साधून लगट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या पंधरा ते वीस बनावट खात्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

Web Title: Bodybuilder Khamkar names fake accounts on Facebook