वारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:13 IST2020-10-03T12:12:31+5:302020-10-03T12:13:22+5:30

बच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील वारणा नदीपात्रात बांदल गवतफड येथे बाळकाबाई धर्मा कांबळे (वय ८५, थेरगाव, ता. शाहूवाडी ) या वृध्द महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात करण्यात आली असून याबाबतची फिर्याद मुलगा जनार्दन कांबळे यांनी दिली आहे.

The body of an old woman was found in the Varna river basin | वारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला

वारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला

ठळक मुद्देवारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडलाकोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन

कोडोली - बच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील वारणा नदीपात्रात बांदल गवतफड येथे बाळकाबाई धर्मा कांबळे (वय ८५, थेरगाव, ता. शाहूवाडी ) या वृध्द महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात करण्यात आली असून याबाबतची फिर्याद मुलगा जनार्दन कांबळे यांनी दिली आहे.

कोडोली पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळकाबाई कांबळे या बुधवार दि. ३० रोजी सकाळी घरात कोणाला न सांगता बाहेर गेल्या होत्या. घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा परीसरात तसेच पाहुणे मंडळी यांच्याकडे शोध घेतला, परंतु त्या सापडल्या नाहीत.

शुक्रवारी त्यांच्या नातेवाईकांनी बच्चेसावर्डे येथे वारणा नदी परीसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी काही लोकांना नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याचा दिसून आला. नदी पात्रात पाण्याचा वेग कमी असल्याने बाहेर काढण्यात आला, तेव्हा मृतदेह  बाळकाबाई यांचा असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती कोडोली पोलिसात देण्यात आली. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: The body of an old woman was found in the Varna river basin