शिंगणापूरच्या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:19 IST2020-11-20T18:07:33+5:302020-11-20T18:19:53+5:30
accident, kolhapurnews, muncipaltycarporation इराणी खाणीच्या परिसरात फिरत असताना तोल जाऊन पडलेल्या विनय बाबूराव कांबळे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. करवीर) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचा पंचनामा केला. गुरुवारी (दि. १९) सायंकाळी विनय पाण्यात बुडाला होता.

शिंगणापूरच्या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
कोल्हापूर : इराणी खाणीच्या परिसरात फिरत असताना तोल जाऊन पडलेल्या विनय बाबूराव कांबळे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. करवीर) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचा पंचनामा केला. गुरुवारी (दि. १९) सायंकाळी विनय पाण्यात बुडाला होता.
शिंगणापुरात राहणारा विनय गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रंकाळा तलाव परिसरातील इराणी खणीवर आला होता. आपली दुचाकी काठावर लावून तो तेथूनच फिरत होता. तोल जाऊन तो पाण्यात पडला. तेथून जाणाऱ्या लोकांनी काठीच्या साहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो बुडाला.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता विनयचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने नागरिकांनी पाहिले. जुना राजवाडा पोलीस व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली.