भादोले येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:48 IST2018-06-26T17:43:39+5:302018-06-26T17:48:25+5:30
भादोले (ता.हातकणंगले)येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आला.या प्रकरणी तंटामुक्ती समिती अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

भादोले येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खून
पेठवडगाव : भादोले(ता.हातकणंगले)येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आला. या प्रकरणी तंटामुक्ती समिती अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना रविवारी दुपारी घडली होती.मात्र आकस्मिक मृत्यूचा बनाव ओळखून पोलिसांनी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिवाजी रामा पाटील (वय ४८) यास अटक केली आहे. मृत झालेल्या महिलेचे नाव रंगुबाई तातोबा कुरणे (वय ४७) आहे.
दरम्यान दोषींवर कारवाई करावी यासाठी भादोले-सावर्डे येथील मातंग समाजातील ग्रामस्थांनी निवेदन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना दिले.
या निवेदनात संशयित खूनी भिवाजी पाटील व यांच्या यांच्या साथीदारांवर दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याने कारवाई करावी. अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे