गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात सोमवारी लोकमतचे महारक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 14:48 IST2021-07-07T14:45:55+5:302021-07-07T14:48:35+5:30
LokmatEvent BloodDonetaion Camp Kolhapur : लोकमत नातं रक्ताचं या उपक्रमांतर्गत महारक्तदान शिबीर सोमवारी (१२) रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत होत आहे. लोकमतचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी दिली.

गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात सोमवारी लोकमतचे महारक्तदान शिबीर
गडहिंग्लज : लोकमत नातं रक्ताचं या उपक्रमांतर्गत महारक्तदान शिबीर सोमवारी (१२) रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत होत आहे. लोकमतचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी दिली.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक व क्रीडा विभागातर्फे हे शिबीर होत आहे. त्यासाठी डॉ. आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल उंदरे व प्रा. संतोष बाबर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. निलेश शेळके, एनसीसी विभागप्रमुख प्रा. अश्विन गोडघाटे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. विकास अतिग्रे आदी उपस्थित होते.
दत्तक ६ गावातही शिबीर
शिवाजी विद्यापीठाच्या माझं गाव, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तक घेण्यात आलेल्या लिंगनूर काानूल, बेकनाळ, बड्याचीवाडी, शेंद्री, हनिमनाळ, शिंदेवाडी या ६ गावातही रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन आहे, असेही प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले.