कोल्हापूरात जवाहरलालजी दर्डा जयंतीदिनी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:25 IST2020-07-02T17:50:20+5:302020-07-02T18:25:15+5:30
लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे लोकमतच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. राजेंद्र चिंचणीकर यांच्या हस्ते शिबिराचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. महेंद्र यादव, जनसंपर्क अधिकारी माधव ढवळीकर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे लोकमतच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमतचे-संस्थापक संपादक स्व. जवाहरलालबाबू दर्डाजी यांची जयंती प्रतिवर्षी २ जुलै रोजी साजरी करण्यात येते. यानिमित्ताने राज्यभरात विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोल्हापूर आणि गोव्यामध्ये यानिमित्त भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. कोरोनाच्या संकटकाळामध्ये तर रक्तदान करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
येथील शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील राधाकृष्ण मंदिरामध्ये सकाळी १० वाजता या शिबिराचे उद्घाटन अर्पण ब्लड बँकेचे डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. महेंद्र यादव, जनसंपर्क अधिकारी माधव ढवळीकर यांच्या हस्ते आणि लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी लोकमतचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते. दिवसभरामध्ये विविध वयोगटांतील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही सहभाग होता.
सामाजिक अंतर आणि योग्य दक्षता
या शिबिराचे आयोजन करताना सामाजिक अंतर आणि अन्य दक्षता घेण्यात आली होती. सॅनिटायझेशन करूनच नागरिकांना रक्तदानासाठी प्रवेश दिला जात होता. या उपक्रमासाठी राधाकृष्ण मंदिर व्यवस्थापनाचेही सहकार्य लाभले.