शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

उजळाईवाडी पुलाखाली नाल्यात स्फोटकाच्या पिशव्या ; मित्राभोवतीच तपासाचा ससेमिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:35 IST

हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देचौगुले यांच्या जबाबामधूनच या स्फोटाचे रहस्य उलगडण्याची दाट शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले.

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाच्या रस्त्याकडेच्या नाल्यात शनिवारी आणखी तीन स्फोटकांच्या पिशव्या पोलिसांना आढळून आल्या. त्या फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी दिल्या आहेत. ही स्फोटके कमी तीव्रतेची असून, फटाके बनविण्यासाठी दारूगोळा अ‍ॅल्युमिनियमच्या डब्यातून घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. मृत चालक दत्तात्रय गणपती पाटील (वय ५६, रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) हे स्फोटामध्ये जागीच ठार झाले. त्यांचा मित्र आशिष आनंद चौगुले (रा. जाधववाडी) यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्या दोन्ही मोबाईलवरील कॉल डिटेल्सही पोलीस तपासत आहेत.

औट बॉम्ब बनविण्यासाठी वापरला जाणारा दारूगोळा पिशवीमध्ये मिळून आला आहे. त्यामध्ये तीन प्रकारची रासायनिक पावडर, कागदी पिशवी, अर्धवट जळालेले दोऱ्याचे तुकडे, पुंगळी यांचा समावेश आहे. हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना स्फोट झाल्याने पोलीस हडबडले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, गोकुळ शिरगावचे सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह बॉम्बशोध पथक, दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाची जागा पाहिली असता संशयास्पद वस्तुस्थिती दिसून आली. प्रथमदर्शनी हा आत्मघाती हल्ला, पूल पाडण्याचा कट, मानवी जीवितहानी करण्याचा उद्देश असू शकतो का, या दृष्टीने तपास केला; परंतु स्फोटाची तीव्रता आणि सापडलेल्या अवशेषांवरून तसे काही दिसून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी मृत ट्रकचालक दत्तात्रय पाटील यांचा मित्र आशिष चौगुले यांच्या भोवतीच तपासाची चक्रे फिरविली आहेत.

चौगुले यांचाही ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. तसेच या ठिकाणी कोणी स्फोटकाचा डबा ठेवला होता का, या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. परिसरातील मोबाईल टॅकही तपासले जात आहेत. तसेच गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी ते शिवाजी विद्यापीठ रोडवरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आहेत. उड्डाणपुलाखालून जाणारा पादचारी रस्ता पोलिसांनी सील केला आहे. 

स्फोटाची अशी शक्यताचालक दत्तात्रय पाटील हे गोकुळ शिरगाव ते शिरोली एमआयडीसी अशी मालवाहतूक करीत होते. त्यांनी सोबत ही स्फोटके आणली असावीत. उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ येताच ट्रकचा अ‍ॅक्सल रॉड तुटल्याने तो पुलाच्या मधोमध असलेल्या फूटपाथला धडकला. त्यानंतर चालक पाटील यांनी मित्र आशिष चौगुले यांना फोन करून बोलावून घेतले. विधानसभा निवडणुकीमुळे सर्वत्र नाकाबंदी होती. वाहनांची तपासणी सुरू असल्याने भीतीपोटी पाटील हे स्फोटकांचा डबा ट्रकमधून फूटपाथच्या झाडीत लपवून ठेवत असताना स्फोट होऊन ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. त्यानंतर मित्र पाटील यांना हा प्रकार लक्षात आला. स्फोटकांच्या काही पिशव्या उजळाईवाडीच्या दिशेच्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये मिळून आल्या आहेत. त्या कोणी टाकल्या त्यासाठी पोलिसांनी आशिष चौगुले यांच्याभोवतीच चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यांचे दोन्ही मोबाईल जप्त केले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. चौगुले यांच्या जबाबामधूनच या स्फोटाचे रहस्य उलगडण्याची दाट शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले. 

अज्ञात व्यक्तीवर गुन्हाउजळाईवाडीच्या हद्दीतून जाणाºया पुणे-बंगलोर महामार्गाजवळील कोल्हापूर शहराशी जोडणाºया उड्डाणपुलाखाली दत्तात्रय पाटील हे त्यांच्या नादुरुस्त झालेल्या ट्रकजवळ थांबले असताना ट्रकच्या पुढील बाजूस (उत्तरेस) पुलाखाली असलेल्या छोट्या सिमेंट कठड्याजवळील झुडपालगत अज्ञात व्यक्तीने स्फोटके ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या डब्यास त्यांचा धक्का लागताच स्फोट होऊन पाटील यांचा मृत्यू झाला. सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने स्फोटकांचा डबा ठेवणाºया अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ३०४ सह स्फोटक अधिनियम १८०८ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आशिष आनंद चौगुले (वय ३७, रा. जाधववाडी, कोल्हापूर) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेला स्फोट हा दहशतवादी प्रकार दिसून येत नाही. या स्फोटाचा तपास सुरू असून लवकरच यामागील उलगडा होईल.- डॉ. अभिनव देशमुख : पोलीस अधीक्षक

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBombsस्फोटकेPoliceपोलिस