शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

भाजपच्या सेवा सप्ताहास प्रारंभ, रूग्णालये-वस्त्यांमध्ये फळे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 2:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगर भाजपतर्फे सेवा सप्ताह उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देभाजपच्या सेवा सप्ताहास प्रारंभ रूग्णालये, वस्त्यांमध्ये फळे वाटप

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगर भाजपतर्फे सेवा सप्ताह उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसूृती वॉर्डमधील महिलांना फळांचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. राहुल चिकोडे म्हणाले, संपूर्ण देशभरात भाजप कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत मोदी यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत.शिवाजी पेठ मंडलामध्ये अंबाई टँक परिसरातील माजगांवकर मळा याठिकाणी फळे वितरण करण्यात आली. याठिकाणी जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, भाजपा गटनेते अजित ठाणेकर उपस्थित होते.

मंगळवार पेठ मंडलामध्ये बाल संकुल येथील विद्यार्थ्यांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंडल अध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, संभाजी जाधव, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हार्डिकर उपस्थित होते.शाहूपुरी मंडलाच्यावतीने रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, उमा इंगळे, मंडल अध्यक्ष प्रग्नेश हमलाई, तर उत्तरेश्वर पेठ मंडलाच्यावतीने पंचगंगा हॉस्पिटल येथे रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मंडल अध्यक्ष भरत काळे उपस्थित होते. कसबा बावडा मंडलामध्ये सेवा रुग्णालयात रुग्णांना फळे वितरित करण्यात आलीत. यावेळी मंडल अध्यक्ष डॉ. राजवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलNarendra Modiनरेंद्र मोदी