शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा फळाला

By admin | Updated: September 7, 2015 22:19 IST

अनेकांना संधी : आजरा तालुक्यात प्रमुख संस्थांमध्ये भाजपला स्थान

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा  अनेक राजकीय चढ-उतार आले तरीही पक्षाशी प्रामाणिक राहून कामात राहणाऱ्या आजरा तालुक्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षाची सत्ता आल्यानंतर ठिकठिकाणी सन्मानाचे स्थान मिळत असल्याने खऱ्या अर्थाने भाजप कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा फळाला येत आहे.आजऱ्याच्या माजी सरपंच शुभदा जोशी यांना जिल्हा नियोजन मंडळावर संधी मिळाली आहे. आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नयन भुसारी यांची वर्णी लागली आहे. आजरा सूतगिरणीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कुंभार हे ‘संचालक’पद भूषवत आहेत, तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण देसाई आणि श्रीपती यादव यांना संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये अनुक्रमे अध्यक्ष व अशासकीय सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. बापू टोपले राष्ट्रवादीचा वरचष्मा असणाऱ्या जनता बँकेत संचालक म्हणून काम करीत आहेत. लवकरच तालुका संघाच्या स्वीकृत तज्ज्ञ संचालकपदी भाजपचे श्रीपती यादव यांची निवड होण्याची शक्यता आहे. भविष्यात होणाऱ्या आजरा साखर कारखाना निवडणुकीतही ‘भाजप’ला जवळ करण्याशिवाय प्रमुख आघाड्यांना पर्याय नाही. मलिककुमार बुरुड, प्रा. सुधीर मुंज, माजी सरपंच जनार्दन टोपले यांनाही ठिकठिकाणी संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकंदर इतर पक्षांची पडझड, अंतर्गत धुसफूस कार्यकर्त्यांच्या ‘बेडूकउड्या’ सुरू असताना आजरा येथील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र स्वत:ची पतसंस्था, शैक्षणिक संस्था सांभाळत ग्रामपंचायत, सूतगिरणी, तालुका खरेदी-विक्री संघ, शासकीय समित्या, जनता बँक या प्रमुख संस्थांमध्ये आपले स्थान घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. ‘एकच’ कार्यकर्ता मोठा करण्याऐवजी ‘अनेकांना’ ठिकठिकाणी दिली जाणारी संधी भाजपच्या पथ्यावर पडत आहे.‘चंद्रकांतदादांचे लक्ष’सहकारमंत्री चंद्रकांतदादा यांचा कित्येक वर्षांपासून आजरा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. मंत्री नसतानाही त्यांनी शक्य तो निधी आजरा तालुक्यातील विकासकामांना दिला आहे. त्यामुळे हक्काने भाजप कार्यकर्ते चंद्रकांतदादांशी विकासकामांकारिता ‘थेट’ संपर्क साधत आहेत, हीसुद्धा जमेची बाब ठरत आहे.