शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजप-शिंदेसेना युतीचं जमलं, ५४-११ चा फॉर्म्युला निश्चित; राष्ट्रवादी गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:22 IST

उमेदवारी न मिळालेले काही बूथप्रमुख सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उचलणार

इचलकरंजी : महानगरपालिकेसाठी भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी कोल्हापूर येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किरकोळ फेरबदल करण्यात आले. त्याचबरोबर शिंदेसेनेसोबत युती करण्याचेही निश्चित झाले असून, त्यामध्ये ५४ जागा भारतीय जनता पार्टीला आणि ११ जागा शिंदेसेनेला देण्यावर एकमत झाल्याचे समजते.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर निश्चित केलेल्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचनाही येथील भाजप कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यामध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप झाला होता. याची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन या यादीला स्थगिती दिली होती.

वाचा : शिव-शाहू आघाडीला धक्का; आप, स्वाभिमानी पक्षानंतर उद्धवसेनाही पडली बाहेरमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात बैठक घेऊन अंतिम उमेदवारी यादी निश्चित केली. त्यासाठी संघटनमंत्री मकरंद देशपांडे, आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत दीड तासांहून अधिक काळ चर्चा झाली. चर्चेअंती दोन ठिकाणी किरकोळ बदल करण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.

तसेच जे निष्ठावंत महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांना स्वीकृत करण्यासंदर्भात आश्वासन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर आता इच्छुक असलेले कार्यकर्ते कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने अद्याप त्यांची भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी गोपनीयतानिश्चित झालेल्या उमेदवारांना भाजपकडून बी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, यादीमध्ये नेमके कोणते बदल झाले, याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. पहिली यादी बाहेर पडल्यानेच बंडखोरी तसेच नाराजीचा सामना करावा लागल्याने रविवारी कोल्हापुरात झालेल्या बैठकीचा वृत्तांत बाहेर पडण्यापासून रोखण्यात आला.

सामूहिक राजीनाम्याचे अस्त्रपक्षश्रेष्ठींकडून माहिती बाहेर पडली नसली तरी महायुतीमधील राजकीय घडामोडी रविवारीही सुरूच होत्या. उमेदवारी न मिळालेले काही बूथप्रमुख सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उचलणार आहेत. सोमवारी शिवतीर्थाजवळ येऊन राजीनामा देण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Election: BJP-Shinde Sena Alliance Finalized; NCP Still Mysterious

Web Summary : BJP and Shinde Sena finalized alliance for Ichalkaranji election, with 54-11 seat-sharing. Internal disputes led to candidate list revisions. Dissatisfied workers threaten resignations, while NCP's strategy remains unclear.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार