शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आपसांतील मतभेद बाजूला ठेवून राजेश पाटील यांना धडा शिकवा - व्ही. बी. पाटील यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 3:48 PM

चंदगड : चंदगड तालुका पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे आपसांतील मतभेद बाजूला ठेवून सुज्ञ व समविचारी लोकांना एकत्र करून आमदार ...

चंदगड : चंदगड तालुका पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे आपसांतील मतभेद बाजूला ठेवून सुज्ञ व समविचारी लोकांना एकत्र करून आमदार राजेश पाटील यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले.मजरे कार्वे येथे शरद पवार समर्थक राष्ट्रवादी कार्यकत्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत होते. माजी महापौर आर. के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे म्हणाले की, आमदार राजेश पाटील यांना विधानसभेचे तिकीट देताना मोठा विरोध झाला. आपण त्यांना तिकीट मिळवून दिले होते. त्याचा त्यांना विसर पडला आहे. यावेळी शिवानंद माळी, बी. डी. पाटील, अनिल घाटगे, शिवाजी खोत, विजय पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवप्रसाद तेली, विष्णू तरवाळ, अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गोपाळ ओऊळकर यांनी प्रास्ताविक केले. एम. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भैरू खांडेकर यांनी आभार मानले. भाजपच्या सरपंच राष्ट्रवादीतकुदनूर येथील भाजपच्या सरपंच संगीता घाटगे व त्यांचे पती उद्योजक सुरेश घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.भाजपला धक्का, तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत केले होते सत्तांतर विकासाची ब्लू प्रिंट तयार करून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस घेऊन तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ गटाला हादरा देत उद्योजक सुरेश घाटगे यांनी एकहाती सत्ता मिळवत आपल्या पत्नीला सरपंचपदी विराजमान केले होते. उद्योजक घाटगे यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपच्या झेंड्याखाली पॅनल बनवून सत्तारूढ कोकितकर गटाला धोबीपछाड दिला होता. त्यावेळी त्यांनी प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हायटेक प्रचार यंत्रणा राबवली. मतदारांनीही त्यांना कौल देत एकहाती सत्ता सोपवली. उद्योजक घाटगे यांनी अवघ्या सहा महिन्यात भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे.

चड्डीवाल्यात मोठी ताकद चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता शरद पवारांच्या विचाराने चालणारी आहे. लाल मातीतील चड्डीवाल्या माणसांत मोठी ताकद आहे. म्हणूनच या मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रवादीचाच आमदार आहे, असे गडहिंग्लजचे माजी सभापती अमर चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडPoliticsराजकारण