आमदार निलंबन प्रकरणी भाजपतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:47 IST2021-07-06T15:45:17+5:302021-07-06T15:47:50+5:30
Bjp Kolhapur : बारा आमदारांच्या निलंबन केल्याच्या निषेधार्त भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

भाजपच्यावतीने बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेर्धात निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डावीकडून हेमंत आराध्ये, राहूल चिकोडे, विजय जाधव, दिलीप मैत्राणी, नाथाजी पाटील, अशोक देसाई, गणेश देसाई उपस्थित होते.
कोल्हापूर : बारा आमदारांच्या निलंबन केल्याच्या निषेधार्त भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
भाजपा शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील म्हणाले, झालेली ही कारवाई लोकशाहीला काळीमा फासणारी आहे.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, जनतेची दिशाभूल करणारे हे अधिवेशन असून विरोधी पक्षातील सक्षम नेतृत्व अकार्यक्षम सरकारचा पाढा विधानसभेत वाचून या आखाड्यात देखील आपल्याला धोबीपछाड करेल या भीतीने हे षडयंत्रच रचले गेले.
यावेळी सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, भगवान काटे यांनी आमदारांच्या निलंबना बद्दल आपल्या मनोगता मध्ये व्र निषेध नोंदवला. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भाउसो गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विठ्ठल पाटील, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, जिल्हा ग्रामीणचे हंबीरराव पाटील, महेश मोरे, शरद महाजन, सचिन पाटील, दीपक शिरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.