Kolhapur: भाजपची कार्यकारिणी जाहीर, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक; आजऱ्याचे कार्यालय केलं बंद
By समीर देशपांडे | Updated: September 8, 2023 19:13 IST2023-09-08T19:11:17+5:302023-09-08T19:13:58+5:30
कमळ चिन्हावर पांढरा रंग तर भाजपचा फलकही काढला

Kolhapur: भाजपची कार्यकारिणी जाहीर, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक; आजऱ्याचे कार्यालय केलं बंद
कोल्हापूर : भाजप ग्रामीणची कार्यकारिणी जाहीर होवून २४ तास उलटण्याच्या आतच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील आजरा येथील पक्षाचे कार्यालयच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद केले आहे.
जिल्हाध्यक्ष राहूल देसाई यांनी गुरूवारीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये आजरा तालुकाध्यक्षपदी भाजपमध्ये नव्याने आलेल्या अशोक चराटी गटाचे बाळ केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून काम पाहिलेले प्रा. सुधीर मुंज, अरूण देसाई, नाथा देसाई, सुधीर कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीनगरमधील कार्यालय बंद करण्यात आले.
दरम्यान, कमळ चिन्हावर पांढरा रंग लावण्यात आला तसेच कार्यालयातील भाजपचा फलकही काढण्यात आला आहे. यावेळी सचिन इंदलकर, भास्कर बुरूड, महेश नार्वेकर, गुरू टोपले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.