शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची मदत भाजपलाच

By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST

विश्वजित कदम : चार मतदारसंघात ‘सेटलमेंट’चा आरोप

सांगली : सांगली जिल्ह्यासह राज्यातील निकाल हे कॉँग्रेसच्या दृष्टीने निराशाजनक लागले आहेत. जिल्ह्यातील पलूस-कडेगाव, जत, सांगली आणि मिरज या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप यांची सेटलमेंट असल्यामुळेच राष्ट्रवादीने भाजपला उघडपणे मदत केली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी आज (रविवारी) सांगलीत पत्रकार परिषदेत केला.विधानसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने राज्यात सरकार बनविण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, हे कशाचे लक्षण आहे, असा प्रश्न उपस्थित करुन विश्वजित कदम म्हणाले की, यामुळे राष्ट्रवादीच्या विचारधारेवर शंका निर्माण झाली आहे. पाठिंबा देण्यामागे केवळ त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, हाच हेतू असण्याची शक्यता आहे. वास्तविक कॉँग्रेसने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले होते. परंतु आम्ही लोकांशी सुसंवाद साधण्यास कमी पडलो. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांसह सर्वच कॉँग्रेस नेत्यांनी प्रथमपासूनच आक्रमकपणे भाषणे करायला हवी होती. हे झाले नाही. याउलट भाजपने लोकसभेप्रमाणेच मार्केटिंग तंत्राचा प्रभावीपणे वापर केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांमुळेच भाजपला राज्यात यश मिळाले आहे. भाजपचे यश केवळ मोदी यांचेच आहे.ते म्हणाले की, या निकालामुळे अद्यापही मोदींचा शहरी आणि ग्रामीण मतदारांवर प्रभाव होत असल्याचे दिसून आले आहे. यापुढील काळात स्थानिक स्वराज संस्थांसह अन्य निवडणुका होत आहेत. त्यामध्ये मतविभागणी टाळायची असेल, तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील निकालावर मी निराश असून, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचेही कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भाऊंचा पराभव धक्कादायकसांगली मतदारसंघात मदनभाऊ पाटील यांचा झालेला पराभव हा धक्कादायक आहे. महापालिका कारभारावर त्यांचे योग्य नियंत्रण असायला हवे होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने भाजपला केलेली मदत, एलबीटीचा प्रश्न, धनगर समाजाची विखुरलेली मते आणि प्रस्थापित सरकारविरोधात असलेली लाट याचा फटका त्यांना बसला असल्याचे दिसत आहे, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.