मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:37 IST2025-04-09T17:32:31+5:302025-04-09T17:37:21+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Big news Prashant Koratkar granted bail Kolhapur court decision | मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल

कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा कोल्हापूरन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  काही दिवसापूर्वी कोरटकर याने कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करुन धमकी दिली होती. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले होते.

“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका

याआधी कोर्टाने प्रशांत कोरटकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान कोरटकरने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता. 

न्यायालयात तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला असल्याचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले. ज्या कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसल्याचे सरोदे यांनी सांगितले.

प्रशांत कोरटकरवर अब्रुनुकसानीचा दावा

प्रशांत कोरटकरवर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. इंद्रजित सावंत यांनी कारागृहाच्या पत्यावरच कोरटकरला ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामीन अर्जात त्याने इतिहास संशोधक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आणि सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत व त्यांना अटक झाली होती इत्यादी खोटी माहिती लिहिली होती. त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप त्यांनी न्यायालयात केल्यावर प्रशांत कोरटकर तर्फे ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगण्यात आले होते. 

Web Title: Big news Prashant Koratkar granted bail Kolhapur court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.