भाज्यांच्या दरात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:02+5:302021-04-18T04:22:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र उठाव नसल्याने ...

A big drop in the price of vegetables | भाज्यांच्या दरात मोठी घसरण

भाज्यांच्या दरात मोठी घसरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र उठाव नसल्याने दरात घसरण झाली. साधारणपणे १० ते ४० टक्क्यापर्यंत दर खाली आले असून आठवडी बाजार, भाजीमंडई बंद असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

कोल्हापूर बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची आवक चांगली असते. आठवडी बाजारामुळे या मालाचा उठावही होतो. मात्र सध्या संचारबंदी असल्याने आठवडी बाजार, भाजी मंडई बंद आहेत. त्याचा परिणाम बाजार समितीतील भाजी विक्रीवर दिसत आहे. बाजार समितीत शनिवारी ३ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. मात्र उठाव नसल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कोबी, ढब्बू, गवार, कारली, भेंडी, वरणा या भाज्यांच्या दरात ४० टक्क्यापर्यंत घसरण झाली. वांग्यासह इतर भाज्यांच्या दरात सरासरी १० टक्के घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कर्मचारी पहाटेच बाजार समितीत

भाजीपाल्याचे सौदे पहाटे ५ वाजता सुरू होतात, तत्पूर्वी सोशल डिस्टिन्शन राखून सौदे सुरू करण्यासाठी बाजार समितीची यंत्रणा कार्यरत असते. शनिवारी पहाटे साडेचार वाजता सचिव जयवंत पाटील यांच्यासह कर्मचारी सौद्याच्या ठिकाणी हजर होते.

बॅरिकेट लावूनच सौदे

सौद्यावेळची गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक अडत दुकानात बॅरिकेट लावण्यात आले आहेत. शेतीमाल शेड मध्ये उतरून बॅरिकेटच्या बाहेरूनच बोली लावली जाते.

Web Title: A big drop in the price of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.