शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव प्रकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यातही पडसाद, टायरी जाळून रास्ता रोको आंदोलन, पोलिसांची गाडी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:13 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी कोल्हापूर शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देइचलकरंजी, पट्टणकोडोली, हुपरी, कागल परिसरात पडसाद इचलकरंजी परिसरातील काही मोठी दुकाने बंद, कामगार संघटनेची भव्य फेरी रद्द ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी कोल्हापूर शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.

इचलकरंजी, कागल, हुपरी आणि पट्टणकोडोली या गावामध्ये काही युवकांनी चौकात टायरी जाळून रास्ता रोको करण्यात आले. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर शहरात बिंदू चौकात या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध संघटना दुपारनंतर एकत्र येणार आहेत.भीमा कोरेगाव येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादावरून दगडफेक झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. कोल्हापूर शहरात काही युवकांनी सदर बाजार परिसरात रस्त्यावर येत रास्ता रोको केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्ह्यातील इचलकरंजी, पट्टणकोडोली, हुपरी आणि कागल परिसरातही या घटनेचे पडसाद उमटले.इचलकरंजी परिसरातील शिरदवाड चौकात टायरी जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कबनुर येथे पोलिसांच्या गाडीला जमावाने अडवले होते. इचलकरंजी शहर आता बंद करा असे म्हणत काहीजण फिरत आहेत. मात्र, त्यांच्या आवाहनाला जास्त प्रमाणात पाठिंबा मिळालेला नाही.

मुख्य मार्गावरील फेरीवाल्यांनी आपली दुकाने गुंडाळली आहेत. काही मोठी दुकाने दुकानदारांनी बंद ठेवली आहेत. या परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी जमावाला प्रांत कार्यालयात आणून समजावून सांगितल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. इचलकरंजी परिसरातील वातावरणामुळे इथे निघणारी कामगार संघटनेची भव्य फेरी रद्द करण्यात आली आहे.दरम्यान, भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निवेदन पट्टणकोडोली येथील बौद्ध समाजाने हुपरी पोलिसांना दिले. वसगडे येथेही बंद पाळण्यात आला असून तेथे राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. रुकडी येथेही काही ठिकाणी दगडफेक झाल्याचे समजते. कागल येथेही काहीजण सकाळी एकत्र आले होते. पण जबाबदार नागरीकांनी समजावुन सांगितल्यामुळे हा परिसर शांत राहिला. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथेही शांततेत बंद पाळण्यात आला.दरम्यान, कागल तालुक्यातील सांगाव येथे एका व्यक्तीने सोशल मिडियावर चुकीचा डीपी ठेवल्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी संबंधिताला समज दिली. मात्र दुसऱ्या एका युवकानेही याच डीपीची पुनरावृत्ती केल्याने त्याबाबत नोंद झाली आहे. गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते, मात्र पोलिस अधिकारी औदुंबर पाटील यांच्या आवाहनानंतर बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस