भीमजयंतीचे योग्य नियोजन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:25 IST2021-04-08T04:25:59+5:302021-04-08T04:25:59+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाचे प्रशासनाने योग्य नियोजन करावे, ...

Bhim Jayanti should be properly planned | भीमजयंतीचे योग्य नियोजन व्हावे

भीमजयंतीचे योग्य नियोजन व्हावे

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाचे प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी रात्री बारा वाजता व दिवसभर मोठ्या संख्येने अनुयायी बिंदू चौकात त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा कोरोनाचा प्रकोप पाहता प्रशासनाने योग्य नियोजन करून जयंती कार्यक्रमास परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जयंती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड, बाळासाहेब भोसले, रूपा वायदंडे, सदानंद दिघे, एस. पी. शेंडगे, संग्राम मोरे, आदी उपस्थित होते.

--

Web Title: Bhim Jayanti should be properly planned