शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सख्खे दोस्त बनले पक्के वैरी, एकमेकांवर केला हल्ला; एक ठार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 23:34 IST

Kolhapur Crime News: तारदाळ (ता.हातकणंगले) येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकजण ठार झाला, तर दुसरा जखमी आहे. जावीद रशीद मुजावर (वय २२, रा. संगमनगर-तारदाळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

इचलकरंजी : तारदाळ (ता.हातकणंगले) येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. जावीद रशीद मुजावर (वय २२, रा. संगमनगर-तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. यश तानाजी गायकवाड (१९, रा. तारदाळ) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारदाळ गावातील नागनाथ मंदिर या मुख्य चौकात असलेल्या एका पानपट्टीसमोर जावीद व यश यांच्यात सोमवारी सायंकाळी वाद झाला. दोघांच्यात जोरदार झटापट सुरू झाली. त्यात यश याच्या हाताला घाव बसला. झटापटीत त्याने जावीदवर सपासप वार केले. जखमी अवस्थेत जावीद हा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या गणेशमंदिर परिसरात मोकळ्या जागेवर गेला.त्यापाठोपाठ यशही त्याचा पाठलाग करत तेथे जाऊन पुन्हा त्याच्यावर वार केला. या घटनेत जावीद याच्या छातीवर, मानेवर, पोटावर व हातावर असे वार झाल्याने तो जागीच कोसळला. तेथून गंभीर जखमी अवस्थेत जावीद याला ग्रामस्थांनी उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.घटनेनंतर तारदाळ गावात एकच खळबळ उडाली. त्याबरोबर घटनास्थळ व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच हल्ल्याप्रकरणी यश याला ताब्यात घेतले. दोघांच्यात झालेल्या झटापटीमध्ये यशही जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकघटनास्थळावरील पंचनामा करण्यासह फॉरेन्सिक पथक (न्यायवैधिक तपासणी पथक) बोलावून पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे घेतले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी भेट दिली.क्रिकेट आणि निवडणुकीचा वादजावीद व यश हे दोघे पूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. आठ महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळातून दोघांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर जि. प. निवडणुकीतही दोघे वेगवेगळ्या पक्षांतून कार्यकर्ते म्हणून प्रचार करीत होते. त्यावेळीही किरकोळ वाद झाला. त्यातून दोघांच्यात खुन्नस वाढत गेली. तारदाळ यात्रेपूर्वी या दोघांच्यात वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच गावातील काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. त्यामुळे यात्रेत वाद होईल, अशी स्थिती होती, ती मावळली. सर्व काही मिटल्यासारखे असताना सोमवारी अचानक दोघांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि हाणामारीत एकाचा जीव गेला. या घटनेची चर्चा गावभर सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Friends turned foes, deadly attack: One dead, one injured.

Web Summary : In Ichalkaranji, a fight between former friends led to a fatal stabbing. Javed Mujawar died, and Yash Gaikwad is injured. A past dispute escalated, resulting in a public attack. Police are investigating the incident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस