बेळगाव-निपाणी-कºहाड रेल्वेच्या आशा पल्लवित!
By Admin | Updated: May 31, 2014 01:18 IST2014-05-31T00:57:45+5:302014-05-31T01:18:10+5:30
सदानंद गौडा यांची माहिती : उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे; अपघात टाळण्यासाठी नवी यंत्रणा

बेळगाव-निपाणी-कºहाड रेल्वेच्या आशा पल्लवित!
राजेंद्र हजारे -निपाणी कर्नाटकातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच बहुचर्चित बेळगाव निपाणीमार्गे कºहाड ही रेल्वेलाईन दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी बंगलोर येथे सांगितले. त्यामुळे सीमाभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या या रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. धारवाड, बेळगाव निपाणीमार्गे कराड रेल्वेमार्गासाठी जानेवारी २०१२ मध्ये निविदा काढून त्याचा सर्र्व्हे पूर्ण करण्यात आला होता. तेव्हा माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी योग्य प्रकारे पाठपुरावा करून या रेल्वे मार्गाचे महत्त्व पटवून दिले होते. शिवाय या रेल्वेलाईनमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना ७० कि.मी.चा प्रवास कमी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या धारवाड, बेळगााव व्हाया संकेश्वर, निपाणीमार्गे कºहाडपर्यंत अंदाजे २०० कि.मी. रेल्वेलाईनचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून सदानंद गौडा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर उत्तर कर्नाटकात रेल्वेलाईनचे जाळे निर्माण करण्यासह रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्याची तयारी दर्शविली आहे. आगामी अर्थसंकल्पावेळी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन धारवाड-कºहाड या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच रेल्वे अपघात टाळण्यासाठी नवीन यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. धारवाड-कºहाड या नव्या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर हरिप्रिया ते तिरुपती आणि संपर्क क्रांती म्हैसूर ते दिल्ली अशा लांबपल्ल्याच्या गाड्यांचा ७० कि.मी.चा प्रवास कमी होणार आहे. या मार्गावरील औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, बेळगाव, निपाणी, संकेश्वर भागातील शेती मालाला याचा चांगला लाभ होणार आहे. धारवाड-कºहाड निपाणीमार्गे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला तत्कालीन केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी यांनी फेब्रुवारी २०११ मधील रेल्वे अंदाजपत्रकात हिरवा कंदील दाखविल्याने तेव्हापासून या कामाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. हुबळी-मुंबई जलद रेल्वे, बेळगाव-हैद्राबाद आणि बेळगाव-बंगलोर, हुबळी-वास्को अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणीही बर्याच वर्षांपासून होत आहे. त्यांचाही विचार करून आगामी अर्थसंकल्पात प्राधान्य देणात येणार असल्याचेही सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे. धारवाड-कºहाड रेल्वेमार्गामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल.