शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावचे महापौर-उपमहापौरच करताहेत ‘बेळगावी’चा वापर

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

महाराष्ट्र एकीकरणचे ‘बेळगाव’लाच प्राधान्य

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्रालयाने बेळगावचे नाव बदलून ‘बेळगावी’ करायला परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी सरकारी कार्यालये, हॉटेल्स, दुकानदार व खासगी संस्थांना फलकांवर ‘बेळगावी’ असाच उल्लेख करावा, असा आदेश आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावी नामांतराबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. न घाबरता व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी बेळगाव हेच नाव वापरात आणावे, असे आवाहन केल्यानंतर आता चक्क महापौर आणि उपमहापौर यांनीच ‘बेळगावी’ नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. महापौर महेश नाईक व उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्या सरकारी कारवर बेळगाव शहराच्या नावाचा उल्लेख बेळगावी असा आहे. सरकारी गाड्या हे मराठी भाषिक लोकप्रतिनिधी घेऊन शहरभर फिरत आहेत. महापौर-उपमहापौरांच्या या धोरणामुळे मराठी भाषिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीमाभागातील मराठी जनतेची अस्मिता अशी ओळख असणाऱ्या बेळगाव महापालिकेवरचा भगवा ध्वज हटवून कानडीकरण करण्याचा सपाटा कर्नाटक सरकारने लावला आहे. महापौर-उपमहापौर यांच्या धरसोड भूमिकेमुळे सीमाभागातील जनता नाराज आहे. या अगोदरच्या महापौर-उपमहापौरांच्या गाडीवरही भगवा ध्वज लावण्यात येत होता, मात्र माजी महापौर विजय मोरे यांच्या कारकिर्दीत ही परंपरा खंडित झाली होती. सध्या महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता असून, महापौर-उपमहापौर आणि दोन आमदार मराठी भाषिक आहेत, मात्र कानडी सरकार कारवाई करेल, या भीतीने या लोकप्रतिनिधींना मराठी अस्मितेचा विसर पडला आहे. मराठी भाषिकांना झालेल्या येळ्ळूरातील मारहाणीबद्दल संसदेत पडसाद उमटले, बेळगावी नामांतर सुरू आहे. महापालिकांच्या सभेत याला विरोधऐवजी बेळगावी नावाचा आधार हे घेत आहेत.