गैरसमजातून मित्रास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:37+5:302021-05-28T04:18:37+5:30
कोल्हापूर : गैरसमजातून कदमवाडी चौकात युवकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार घडला. अभिषेक दादू साळवी (वय १६, ...

गैरसमजातून मित्रास मारहाण
कोल्हापूर : गैरसमजातून कदमवाडी चौकात युवकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार घडला. अभिषेक दादू साळवी (वय १६, रा. जयभीम सेना गल्ली, विचारेमाळ, सदरबाजार) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पाच तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अभिषेक साळखी हा आपल्या मित्रासह कसबा बावडाकडे जात होता. त्याचवेळी कदमवाडी चौकात गर्दी व मित्र दीपक माने याला पाहून सर्वजण मित्र थांबले. याचवेळी हे सर्वजण भांडण करण्यासाठीच आलेत असा गैरसमज करून प्रदीप ढाकरे, उदय बावणे, आकाश लांबोरे, महेश ढाकरे, रोहीत शिंदे (सर्व रा. कोल्हापूर) यांनी अभिषेक साळवी याला शिवीगळ करत हल्ला केला. याबाबत साळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.