शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

‘बीसीयूडी’च्या संचालकपदी डी. आर. मोरे

By admin | Updated: July 5, 2015 00:59 IST

शिवाजी विद्यापीठाकडून घोषणा : चांगले योगदान देण्याची ग्वाही

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या (बीसीयूडी) संचालकपदी येथील शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांची विद्यापीठाने शनिवारी निवड केली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मोरे यांचे स्वागत केले. या पदासाठी मोरे यांच्यासह राजाराम कॉलेजचे प्राचार्य वसंत हेळवी, प्राचार्य बी. एन. पवार, प्राचार्य प्रवीण चौगुले यांचे अर्ज होते. त्यातून कुलगुरुनी मोरे यांची निवड केली. डॉ.अर्जुन राजगे यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त झाले होते. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांची उत्तरोत्तर प्रगती साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहीन. त्याचप्रमाणे विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन ३.१६ सीजीपीएसह प्राप्त झाले आहे. त्याहून अधिक मानांकन मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन ते साध्य करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी ग्वाही डॉ. मोरे यांनी निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात दिली. व्यवस्थापन परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मोरे हे आपल्या अनुभवाच्या बळावर बीसीयूडी’चे संचालक म्हणून विद्यापीठाच्या प्रशासकीय तसेच शैक्षणिक वाटचालीमध्ये उत्कृष्ट योगदान देतील. त्यांच्या विद्यापीठ प्रशासन, कायदा आणि नियमांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा विद्यापीठाला निश्चितपणे लाभ होईल. या प्रसंगी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्र्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एच. एन. मोरे, डॉ. के. ए. माळी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)