शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur Crime: दीड वर्षांपूर्वी शिकार, बिबट्यावर गोळी झाडणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:17 IST

पोलिस कोठडीत रवानगी, बंदुकीचा शोध सुरू

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील बुझवडे येथे बिबट्याची शिकार करणारा बयाजी रामू वरक (वय ४५, रा. बुजवडे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याने दीड वर्षांपूर्वी ठासणीच्या बंदुकीने बिबट्याला गोळी घातल्याची माहिती चौकशीतून समोर आली. त्याच्याकडील बंदूक अद्याप पोलिसांना सापडलेली नाही. अटकेतील दोघांकडून बिबट्याच्या नख्या विकत घेतलेल्या व्यक्तींचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेले धाकलू बाळू शिंदे (६५, रा. हेरे, ता. चंदगड) आणि बाबू सखाराम डोईफोडे (५७, रा. बांदराई धनगरवाडा, तिलारीनगर, ता. चंदगड) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपोवन मैदानात सापळा लावून पकडले होते. त्यांच्या चौकशीतून बिबट्याची शिकार करणारा बयाजी वरक याचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली. दीड वर्षांपूर्वी बुझवडे येथे शेतात ठासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार केल्याची कबुली त्याने दिली. बंदुकीची माहिती देण्यास तो टाळाटाळ करीत आहे. रविवारी त्याला सोबत घेऊन पोलिसांनी बुझवडे परिसरात बंदुकीचा शोध घेतला. मात्र, प्रत्येकवेळी तो नवीन ठिकाण दाखवत असल्याने अद्याप बंदुकीचा शोध लागलेला नाही.शेळ्या खाल्ल्याने बिबट्याची शिकार?बयाजी वरक याचा शेतात जनावरांचा गोठा आहे. दीड वर्षांपूर्वी बिबट्याने त्याच्या चार शेळ्या फस्त केल्या होत्या. नुकसान झाल्याने त्याने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा विचार केला. त्यानंतर एक दिवस शेळीच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्यावर त्याने गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर बिबट्या एक ते दीड किलोमीटर दूर गेला होता. पाठलाग करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याचे कातडे काढून लपवून ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

नखे घेणारे कोण?वन्य प्राण्यांचे अवयव खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. अटकेतील संशयितांनी १५ हजारांत बिबट्याच्या नखांची विक्री केली आहे. नखे कोणी घेतल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात त्यांनाही आरोपी केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस