शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळचे रणांगण : शाहू आघाडीकडे गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:25 IST

GokulMilk Elecation Kolhapur-गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शाहू आघाडीसोबत आहे, म्हणून निरोप दिलेले नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात असून त्यांच्याशी आणखी काहीजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देगोकुळचे रणांगण : शाहू आघाडीकडे गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थतादोन दिवसांत मोठ्या घडामोडी

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शाहू आघाडीसोबत आहे, म्हणून निरोप दिलेले नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात असून त्यांच्याशी आणखी काहीजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी आघाड्यांमधील रंगत वाढत आहे. सत्तारूढ गटातील संचालक आपल्याकडे वळवत राजर्षी शाहू आघाडीने निवडणूक एकतर्फी असल्याची हवा तयार केली. मात्र, सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आघाडीतील हवा काढण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार आपण शाहू आघाडीसोबत आहे, असा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निरोप देऊन गेलेले दोन नेते अस्वस्थ आहेत.

दुसऱ्या नेत्याने जिल्हा बँकेचे राजकारण सोडवून घेण्यासाठी अट घातल्याचे समजते. त्यानुसार तेथील दुसऱ्या गटाची सगळी ताकद बँकेच्या निवडणुकीत लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीसोबत असणाऱ्या एका माजी संचालकानेही सत्तारूढ गटाशी संपर्क साधला आहे.राजू आवळेंसह, मिणचेकर, स्वरूपा यड्रावकर इच्छुकमहाविकास आघाडीकडून अनुसूचित जाती गटातून आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे इच्छुक आहेत. महिला गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पत्नी स्वरूपा पाटील-यड्रावकर यांचेही नाव पुढे येत आहे. जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्याही नावाची चर्चा सुरू असून गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क असून विशेष म्हणजे ते सर्वाधिक मते असलेल्या करवीर तालुक्यातील आहेत.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर