शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

रोटी डेच्या निमित्याने भुकेलेल्यांना सेवा निलयमचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 12:54 IST

Rodi Day Kolhapur- निलयम संस्थेने सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरातील फिरस्त्यांना, गरजू प्रवाशांना पोटभर भोजन देऊन रोटी डे साजरा केला.

ठळक मुद्देफिरस्ते, गरजूंना दिले भोजन स्टॅड, रेल्वे स्टेशन परिसरात उपक्रम राबवला

कोल्हापूर : नेहमी हजारो रुपये खर्च करून व्हॅलेंटाइन डे, रोज डे आदी विविध डे उत्साहात साजरे करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना मात्र सोमवारच्या (दि. १) रोटी डेचा विसर पडला. अनेक गरजूंना, फिरस्त्यांना पोटाची भूक भागविण्यासाठीही एक रोटीही मिळत नाही. अशा भुकेलेल्यांकडे दुर्लक्ष करून पोट भरून ढेकर देणाऱ्यांवर हजारो रुपये खर्च करणाऱ्या या संस्था रोटी डेच्या प्रसंगी कुठं गायब झाल्या? असा प्रश्न अनेकांना पडला. पण ही उणीव सेवा निलयम संस्थेने भरून काढली. संस्थेतर्फे सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरातील फिरस्त्यांना, गरजू प्रवाशांना पोटभर भोजन देऊन रोटी डे साजरा केला.फेब्रुवारी महिना आला की वेगवेगळे डे साजरा केले जातात. तर भुकेलेल्यासाठीही एक दिवस असावा, म्हणजेच रोटी डे. कोल्हापुरातील सेवा निलयम संस्थेतर्फे भुकेलेल्यांना भोजन देऊन त्यांची पोटाची भूक भागविण्याचा उपक्रम गेली पाच वर्षे राबविला आहे. सोमवारीही (दि. १ मार्च) सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत त्यांनी हा रोटी डे उपक्रम राबवितांना रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, वटेश्वर मंदिर परिसरातील फिरस्ते, गरजू प्रवासी यांना शोधून त्यांना चपाती, मटकीची उसळं, मसाला भात असे भोजन देऊन त्यांची भूक भागविली.

अशा पद्धतीने सुमारे ३००हून अधिक गरजूंना या रोटी डेचा आधार मिळाला. सेवा निलयम या संस्थेच्या माध्यमातून ऐश्वर्या मुनीश्वर, राजकुंवर घाटगे, मयुरी उरसाल, दीपाली शिंदे, महेश उरसाल, सई उरसाल, राहुल गोंदिल, सुजीत साळोखे, सुहास खुडे, अमित देशपांडे, कृष्णात दांडगे, अमर पोवार, सुरज केसरकर, सौरभ कापडी यांनी हा उपक्रम राबवला.

 

टॅग्स :foodअन्नkolhapurकोल्हापूर