कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारा बसवेश्वर जयंती सोहळा व मिरवणूक रद्द करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे व सचिव राजू वाली यांनी दिली.
दरवर्षी बसवेश्वर जयंतीनिमित्त दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात मोठ्या प्रमाणात बसवेश्वर जयंतीचा सोहळा होताे. यंदा १४ तारखेला होणारा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. समाज बांधवांनी घरीच षटस्थल ध्वजारोहण करुन बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन, बसवेश्वरांचे वचन पठण, चिंतन करुन आरती करावी व प्रसाद वाटप करावा. जयंती निमित्त महात्मा बसवेश्वर व अक्कमहादेवी यांची वेषभूषा व प्रतिमा पूजन देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९४२२५२४१११ या नंबरवर व्हिडिओ व छायाचित्र पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
--