ताराबाई पार्कमध्ये भरदिवसा बंगला फोडला, लॅपटॉपसह ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:49 IST2019-06-08T18:48:45+5:302019-06-08T18:49:55+5:30
ताराबाई पार्क बीएसएनएल कार्यालयाशेजारी असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी (दि. ६) भरदिवसा ही चोरी झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

ताराबाई पार्कमध्ये भरदिवसा बंगला फोडला, लॅपटॉपसह ऐवज लंपास
कोल्हापूर : ताराबाई पार्क बीएसएनएल कार्यालयाशेजारी असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी (दि. ६) भरदिवसा ही चोरी झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.
पोलिसांनी सांगितले, सुषमा सागर पाटील (वय २८, रा. मोघार्डे, ता. राधानगरी) या ताराबाई पार्क येथे भाड्याने राहतात. त्या प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) येथे लिपिक आहेत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यालयाला गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्यानंतर बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.
आतमध्ये पाहिले असता चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पाटील या रो हाऊस बंगल्यामध्ये राहतात. त्यांच्याच बाजूला आणखी दोन कुटुंबे राहतात. परिसर नेहमी गजबजलेला असतानाही भरदिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत.