Kolhapur: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला, संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:06 IST2025-08-08T16:06:22+5:302025-08-08T16:06:35+5:30

चित्रपटात शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा

Ban the film Khalid Ka Shivaji demand organizations | Kolhapur: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला, संघटनांची मागणी

Kolhapur: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला, संघटनांची मागणी

कोल्हापूर : ‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. तरी चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि सकल हिंदू समाज या संघटनांनी गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे केली.

चित्रपटात शिवाजी महाराजांबाबतचे दावे भ्रामक, अप्रामाणिक व ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत. या चित्रपटात शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी उदय भोसले, दिलीप भिवटे, अशोक रामचंदानी, विजय पाटील, शीला माने, संभाजी भोकरे, राजू यादव, निरंजन शिंदे, योगेश केरकर, अशोक गुरव किरण दळवी, स्वप्नील घोरपडे, शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे उपस्थित होते.

Web Title: Ban the film Khalid Ka Shivaji demand organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.